विद्यार्थ्यांनी साकारली, रक्षाबंधनची मानवी साखळी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): येथील श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयत विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने रक्षाबंधनची मानवी साखळी तयार करून एक अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिस्तबद्ध पद्धतीने ही मानवी साखळी पूर्ण केली.

एकमेकांचे हात पकडून तयार केलेली ही साखळी समाजात सर्वजण एकमेकांशी जोडलेले आहेत. जात, धर्म आणि भेदाभेद विसरून संपूर्ण समाज एक कुटुंब आहे, हा संदेश याद्वारे विद्यार्थ्यांनी दिला.

ज्याप्रमाणे भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो, त्याचप्रमाणे समाजात प्रत्येकाने एकमेकांच्या विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्धांची सुरक्षेची आणि आदराची जबाबदारी घेतली पाहिजे, हा या साखळीचा मुख्य उद्देश असतो. यासोबतच विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून त्यांच्या संगोपनाची आणि संरक्षणाची जबाबदारी घेण्याची
जबाबदारी घेतली. 

या उपक्रमात पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या आणि घरगुती साहित्यापासून जसे ते कापड, धागे, सुती दोरा बनवलेल्या राख्यांचा वापर केला गेला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि एकतेची भावना निर्माण होईल असे मत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन डमाळे यांनी व्यक्त केले. 

या उपक्रमात विद्यालयातील शिक्षक राजू गाढवे, भाऊसाहेब गावंडे, गणेश सुरडकर, रामेश्वर वाघ, अमोल पालोदकर, पंकज सावंत, अमोल दांडगे, मीरा पांगळे, शितल गीते, सुवर्णा तारो यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.